तेर / प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय व महाराष्ट्र संत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 डिसेंबर रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी बालविवाह प्रतिबंध संवाद कार्यशाळेचे आयोजन सहशिक्षिका ए एन रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. प्रारंभी मुख्याध्यापक एस. एस .बळवंतराव , एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी राठोड , ए. एन .रणदिवे , अंगणवाडी पर्यवेक्षिका  पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते  कर्मवीर मामासाहेब जगदाळे , सावित्रीबाई फुले , माँसाहेब जीजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला .

यावेळी या कार्यशाळेत किशोरवयीन मुलींना बालविवाहाचे दुष्परिणाम व प्रतिबंध कायद्याविषयी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी राठोड व पर्यवेक्षिका  पाटील , मुख्याध्यापक एस. एस. बळवंतराव यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. डी. नरसिंगे तर सुत्रसंचलन एस. बी .पाटील यांनी केले .तर आभार अनुजा मदने या विद्यार्थीने मानले.यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव भंडारे , एस. यु. गोडगे ,  क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , सोनटक्के , साखरे , वाघमोडे आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 
Top