उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केंद्र सरकारने राबवलेल्या ई-श्रम कार्ड योजनेचा गरजू आणि गरिबांना लाभ व्हावा यासाठी शहरातील प्रभाग १० मध्ये अमोल पेठे यांच्या पुढाकारातून  आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन उपनगराध्यक्ष अभय इंगळे यांच्या हस्ते  दि. २५ डिसेंबरला करण्यात आले.

     विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर आणि तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल पेठे यांच्या वतीने २५ डिसेंबर पासून ३० डिसेंबर पर्यंत हे शिबिर राबविण्यात येणार आहे. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे राहुल काकडे,प्रीतम मुंडे, ओम नाईकवाडी, राज निकम, लखन बगाडे, बालाजी पेठे विकास एडके दादा पेठे रियाज शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शिबिराला भेट देऊन समाधान व्यक्त केले.

     पहिल्याच दिवशी ४० महिला आणि पुरुषांचे ई- श्रम कार्ड नोंद करण्यात आली. गरजू नागरिकांनी शिबिरामध्ये सहभाग नोंदवून आवश्यक असणाऱ्या कागदपत्रासह  शिवाजीनगर,सांजा रोड या ठिकाणी सहभागी होऊन लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी ९८६०७७००५५  या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top