उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

डॉ सौ योगिनी संजय देशमुख सरपंच मांडवा (ता.वाशी जि.उस्मानाबाद) यांनी महावितरण द्वारे अनियमित वीजपुरवठा करण्याच्या विरोधात मांडवा ग्रामपंचायत समोर  अमरण उपोषण सुरू केले होते.त्याची त्वरीत दखल वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेऊन नियमित वीजपुरवठा करू व खंडीत झालेले वीजपुरवठा पुर्ववत करू, अशा प्रकारचे लेखी आश्वासन दिल्यामुळे सरपंच डाॅ.योगिनी देशमुख यांनी उपोषण मागे घेतले. सरपंच यांनी केलेल्या उपोषणामुळे शेतकऱ्याचा मात्र प्रश्न सुटल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

सर्वश्री युवराज पाटील, समाधान देशमुख, संतोष देशमुख यांनी मांडवा गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न आमरण उपोषण करून सोडविला.या समयी संजय देशमुख यांनी मांडव्याच्या शेतकऱ्यांच्या अडचणींचा उहापोह करुन कैफियत मांडली.महावितरण कंपनीच्या पत्की मॅडम यांनी वीज पुरवठा सुरुळीत करून देण्याबाबत लेखी कबुली दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या समत्तीने आमरण उपोषण माघे घेतले.बहुसंख्येने शेतकरी वर्ग, नितिन बिक्कड फकराबादचे सरपंच,काका मोरे,सरपंच दसमेगाव,घोळवे सरपंच सोनारवाडी हे आवर्जून उपस्थित होते.तानाजी शिंदे, नितिन रनदिवे माजी उपसरपंच मांडवा, पंडितराव पाटील,भैय्या पाटील,  प्रभाकर शिंदे ,जयराज परिहार,सुरेश परिहार ,मयूर देशमुख  विशाल देशमुख आणि तरुण शेतकरी हजर होते.

 
Top