उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका वेळेवर होण्यास अडचण येत असल्याने निवडणुका विलंबाने घ्याव्या लागत आहेत. जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी काहींची मुदत गुरुवारी संपत आहे. मुदत संपणाऱ्या नगर पालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश शासनाने सोमवारी उशिरा काढले. यात काही ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांवर तर काही ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांवर प्रशासकाची जबाबदारी असणार आहे.

प्रधान सचिव महेश पाठक यांच्या आदेशात म्हटले आहे की, कोरोनामुळे स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेण्यात अडचणी येत असून तिथल्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी आणखी कालावधी लागेल. मुदत संपणाऱ्या नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविल्यानुसार संबंधित नगरपालिकेवर प्रशासक म्हणून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याची अंमलबजावणी करावी. त्यांनी पदभार घेऊन आवश्यक कारवाई करण्याचीही सूचना केली. त्यानुसार जिल्ह्यातील ८ नगरपालिकांचा कार्यकाळ हा आगामी दोन दिवसात संपत आहे.

या नगरपालिकांवर यांची नियुक्ती

नगरपालिका मुदत संपण्याची तारीख प्रशासकपदी नियुक्त अधिकारी

उस्मानाबाद ३० डिसेंबर २०२१ मुख्याधिकारी उस्मानाबाद नप.

भूम २९ डिसेंबर २०२१ मुख्याधिकारी भूम नगरपरिषद

कळंब ३० डिसेंबर २०२१ संबंधित उपविभागीय अधिकारी

मुरूम २९ डिसेंबर २०२१ तहसीलदार, उमरगा

नळदुर्ग २९ डिसेंबर २०२१ संबंधित उपविभागीय अधिकारी

उमरगा २९ डिसेंबर २०२० मुख्याधिकारी उमरगा नप.

परंडा २९ डिसेंबर २०२१ मुख्याधिकारी परंडा नप.

तुळजापूर ०१ जानेवारी २०२१ संबंधित उपविभागीय अधिकारी.

प्रशासक म्हणून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याची अंमलबजावणी करावी. त्यांनी पदभार घेऊन आवश्यक कारवाई करण्याचीही सूचना केली. त्यानुसार जिल्ह्यातील ८ नगरपालिकांचा कार्यकाळ हा आगामी दोन दिवसात संपत आहे. 
Top