उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा उदोग केंद्र व मिटकॉन जिल्हा कार्यालय  उस्मानाबाद यांच्या वतीने तालुक्यातील येडशी येथील महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळमान्यता प्राप्त कॉम्युटर ट्रेनिग सेंटर येथे टॅली या प्रशिक्षण कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा  औपचारिक उद्घाटन सोहळा दि.6 वार सोमवार रोजी 11 ते 2 या वेळेत झाला . मिटकॉन संस्थेचे जिल्हा कार्यालय आधिकारी व्हि,टी ,चव्हाण तसेच शिवसेना जिल्हाउपप्रमुख विजयकुमार सस्ते ,उदयोजक तानाजी जाधव ,पत्रकार दत्ता पवार,नागरीक आशोक देशमुख यांच्या प्रमुख उपस्थीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

शासनाकडुन सक्षम बनवण्यासाठी आर्थीक सहाय्यासह प्रशिक्षण देऊन उद्योग ,व्यवसाय उभारणीस मदत करण्यात येते.संधी ही स्वताःनिर्माण करावी लागते.अथक परीश्रृम केल्यास यश ही मिळते आसे मिटकॉन संस्थेचे जिल्हा कार्यालय आधिकारी श्री व्हि.टी.चव्हाण यांनी तर येडशीत या बॅच मध्ये  निवड झालेल्या युवक-युवतीं,यांनी टॅली या विषयाचे ज्ञान संपादन करून घ्यावे व स्वयंरोजगार निर्माण करावा  असे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सस्ते यांनी मार्गदर्शन करून आपले विचार व्यक्त केले.

 यावेळी प्रतिक्षा सस्ते,नेहा जाधव ,प्रतिक्षा झोंबाडे,वैष्णवी क्षिरसागर,सुषमा तिबोले या प्रशिक्षणार्थ्यांनी  स्वागतगीत सादर करून उपस्थीत मान्यवरांचे स्वागत केले तर सुचिता सस्ते,नेहा जाधव,या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन प्रतिमा सस्ते यांनी केले तर आभार श्री महादेव सस्ते यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आभिषेक आनपट, धिरज पवार,दयानंद सुकाळे, निखिल रणदिवे,यांनी परीश्रम घेतले.

 
Top