तुळजापूर / प्रतिनिधी- 

देवीदर्शनासाठी आलेल्या देवीभक्ताची हरवलेली अंगठी पुजारी नवनाथ इंगळे यांनी परत केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

पुणे येथील देवीभक्त अवधूत घुमे (रा. कसबा पेठ पुणे ) हे मंगळवार दि. ३० रोजी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते.

त्यावेळी त्यांची एक तोळ्याची सोन्याची अंगठी मंदीरात हरवली. ती अंगठी पुजारी नवनाथ इंगळे यांना मंदिरातील पिंपळाच्या पाराजवळ आढळून आली. पुजारी इंगळे यांनी ती अंगठी मंदीर प्रशासन कार्यालयात देवीभक्त अवधूत घुमे यांना ओळख पटवून परत केली.

यावेळी मंदीर संस्थानचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, पुजारी जीवनराजे इंगळे, दीपक पवेकर, देवीभक्त अवधूत घुमे, सौरभ सिध्दे, धनंजय सिध्दे, प्रसाद घुमे, प्रतिक सिध्दे, (सर्व रा. पुणे) उपस्थित होते.


 
Top