तुळजापूर / प्रतिनिधी-

अंबड येथील कृषी सहाय्यक  अशोक सव्वाशे यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अमानुष मारहाण झाली. त्या घटनेचा महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने जाहीर निषेध नोंदवत  दि.२७ रोजी येथील कृषी सहाय्यकांनी काळ्या फिती लावुन कामकाज  केले.

तुळजापूर  तालुका कृषी सहाय्यक संटनेने घटनेचा तीव्र शब्दात जाहीर निषेध नोंदवला व अशा समाज विघातक व दोषी व्यक्तीवर अतिकठोर कारवाईची मागणी केली.यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल पवार, उपाध्यक्ष राहुल मते, जिल्हा संघटना महिला प्रतिनिधी अर्चना माळी, नूतन गायकवाड, पल्लवी  कार्कमकर तसेच कृषी सहायक रामभाऊ बर्डे रणजित, आगळे, संतोष रणदिवे, वर्षा धनके, श्रीमती सरवदे, संतोष माने, नवनाथ आलमले इ उपस्थित होते.

 
Top