उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम वसंतराव काळे यांचा गुरुवार दि.१६ डिसेबर रोजी सायंकाळी ३ वाजता  शिक्षक दरबाराचे आयोजन केले आहे. ‘यशवंतराव चव्हाण सभागृह’ जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे दरबार संपन्न होणार आहे.

शिक्षक दरबारात RTE मान्यता, भविष्य निर्वाह निधी व डीसीपीएसच्या पावत्या, संच मान्यता दुरुस्ती, वैद्यकिय देयके, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संचिका, जुनी पेन्शन योजना, थकित वेतन देयके, आश्रम शाळांतील विविध प्रश्न, सातव्या वेतन आयोग दुसरा हप्ता, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आदी विषयावर चर्चा होणार आहे.

तरी जिल्हयातील सर्व समस्या ग्रस्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, एम. सी. व्ही. सी., आश्रम शाळा, आयटीआय, व वरिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, निदेशक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदिनी मोठया संख्येने लेखी निवेदनासह उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र संघाचे जिल्हाध्यक्ष बालाजी इतबारे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार मेंढेकर, शहराध्यक्षसंभाजी गायकवाड, उपाध्यक्ष नारायण खैरे, राजाभाऊ शिंदे, सुहास वडणे, सचिन पाटील, अभिजित तुळशिदास पिसे, आनंद सोनटक्के यांनी केले आहे.


 
Top