तुळजापूर / प्रतिनिधी-

 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक652नळदुर्ग अक्कलकोट रस्त्याचे काम मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या  निकाला नंतरच महामार्गरस्ता काम केले जाईल,असे लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी शहापूर साठवण तलावात केले जाणारे जलसमाधी आंदोलन मागे घेतले

 न्यायालय आदेशाचे आवमान करून संबंधित ठेकेदार काम करीत आहे यांच्या विरोधात शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने मौजे शहापूर साठवण तलावात “जलसमाधी”आंदोलन करण्यात येणार होते परंतु नळदुर्ग पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक मा.जगदीश राऊत साहेब यांनी हि बाब मा.उपविभागीय अधिकारी, मा.तहसीलदार तुळजापूर मा.कार्यकारी अभियंता रा.मा.सोलापूर याना शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या आसुन जर शेतकऱ्यांच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करावा,असे प्रशासनास कळविले आसता तीनही आधिकारी यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्याचे मान्या केल्यानंतर नळदुर्ग पोलिस ठाण्यात बौठकीचे आयोजन करण्यात आले 

 यावेळी  तहसीलदार तांदळे  यांच्या सह संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी, स्वाभिमानी शेतकरी संघनेचे शहाजी सोमवंशी याच्यासह शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने  सरदारसिंग ठाकूर,  दिलीप जोशी, व्यंकट पाटील,  चंद्रकांत शिदे मेजर, संतोष फडतरे, दिलीप पाटील,  काशिनाथ काळे, तोलु पटेल, विक्रम निकम, नरसिंग निकम, विदयाधर पाटील,आजित पवार मा.कुरेशी, तुकाराम सुरवसे, आर्जुन मोरे, बंडु मोरे यांच्यासह शेतकरी संघर्ष समिती व नळदुर्ग, वागदरी, गुजनुर,शहापूर, गुळ्हाळ्ळी,निलेगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top