उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यातील युवकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत 1994 या वर्षापासून दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. देशातील संस्कृती आणि परंपरा जतन करून या संस्कृतीचे संवर्धन करणारा प्रातिनिधीक युवा संघ राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होतो.महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन होवून स्पर्धक विभागस्तरावर सहभागी होतात. त्यातून गुणी कलावंतांची निवड होवून राज्यस्तरावरील युवा महोत्सवासाठी विभागाचा संघ पाठविला जातो. 2021-22 या वर्षाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन कोविडच्या पार्श्वभुमीवर ऑनलाईन पद्धतीने 3 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. यासाठी आपले प्रवेश अर्ज सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्जासह 30 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम येथे सादर करावेत.आपल्या शाळा, महाविद्यालय, युवक मंडळे यातील इच्छुक कलावंतांना, स्पर्धकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

 
Top