उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गेल्या कित्येक महिन्यापासुन थंडी, ऊन, वारा, पाऊस याची फिकीर न करता देशाच्या राजधानीच्या सिमेवर ठाण बसुन केंद्राच्या कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज मोठा विजय झाला आहे. केंद्राने बहुमताच्या जोरावर कृषी कायदे आणले विना चर्चा मंजुर करुन घेतले, पण हा देश फक्त बहुमताच्या जोरावर चालत नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यापासुन केंद्राच्या विरोधात आंदोलन करुन चर्चेची मागणी केली पण केंद्र सरकार त्यांच्या भुमिकेवरुन हटायला तयार नव्हते. एवढेच नाहीतर शेतकऱ्यांना चिरडुन आंदोलन दडपण्याचा दुर्देवी प्रकार या देशाने पाहिला, शेतकऱ्यांची एकजुट व त्यांचा संघर्ष कायम राहिला अन्न त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या निर्णयापासुन मागे यावे लागले. याविरोधात महाविकास आघाडी सरकारने देखील बंद पुकारुन व वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करुन शेतकऱ्यांच्या बाजुने शक्ती उभा केली होती. देशाची घटना बदलु पाहण्याची मनिषा घेऊन वाटचाल करणाऱ्यांना या देशाचा इतिहास कदाचित कळलेला दिसत नाही. यातुन तरी त्यांना सुबुध्दी येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

आज केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे वापर परत घेतला याबद्दल खासदार ओमराजे यांनी वरील प्रतिक्रीया प्रसार माध्यमासाठी दिली आहे.

 
Top