उस्मानाबाद / प्रतिनिधी-

२०१४ मध्ये लोकसभेच्या प्रचारानिमित्त तुळजापुरात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या तुळजापूर रेल्वे मार्गासाठी आपण शक्य तितक्या वेगाने काम करणार आहोत. तसेच हा प्रश्न सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मार्गी लावणार असल्याची माहिती खासदार आेमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी तुळजापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितली.

 तुळजाभवानी मंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा व्हावी याकरिता जिल्ह्यातील शिवसेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तुळजापूर रेल्वेने जोडावे यासाठी आपण दर महिन्याला महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन आढावा घेत आहोत. या रेल्वे मार्गातील भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. ६० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच महत्त्वाची प्रक्रिया होते. त्यासाठी आपण स्वतः इतर लोकप्रतिनिधींच्या मदतीने हे काम शक्य तेवढ्या वेगाने करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तुळजाभवानी मंदिरातील दर्शनानंतर मंदिर संस्थान समितीच्या कार्यालयात व्यवस्थापक योगिता कोल्हे आणि महसूलचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांच्याशी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 
Top