उस्मानाबाद / प्रतिनिधी-  डॉ. अभिजितसिंह बागल व त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता बागल यांच्या तुळजाई बाल रुग्णालय व प्रसुतीगृहाचे उस्मानाबाद शहरातील नाईकवाडी नगर येथे 5 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडव्याला नवीन जागेत स्थलांतर झाले आहे. खा. ओमराजे निंबाळकर व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा महिला रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. स्मिता गवळी, आयएमए चे अध्यक्ष डॉ. सचिन देशमुख, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. अभय शहापुरकर, डॉ. दत्तात्रय खुणे, शिक्षक तज्ज्ञ एम.डी. देशमुख, नगरसेविका तेजाबाई कल्याणराव पाटील, अनिल नाईकवाडी, शिक्षण विस्तार अधिकारी संजीव बागल, माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार निंबाळकर म्हणाले, तुळजाई बालरुग्णालय हे पाणी पुनर्वापर करणारे पहिले रुग्णालय ठरले आहे. या रुग्णालयात बागल डॉक्टर दाम्पत्याने माफक दरात अद्यायवत सोई सुविधा उपलब्ध करून दिली आहे, हे हॉस्पिटल शहराच्या वैभवात भर घालणारे ठरले आहे. डॉ. अभिजितसिंह बागल हे 2008 पासून जिल्हा रुग्णालयात व महिला रुग्णालयात सेवा देत आहेत, तर डॉ. स्मिता बागल ह्या 2015 पासून जिल्हा महिला रुग्णालयात सेवा देत आहेत. बागल डॉक्टर दाम्पत्याने शहरात आरोग्य सेवा दिल्याबद्दल खा, राजेनिंबाळकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आमदार कैलास पाटील यांनीही रुग्णालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, मित्रमंडळी उपस्थित होती.

 
Top