उस्मानाबाद /प्रतिनिधी-

महाराष्ट्रामधे गेल्या 10 दिवसापासून चालू असलेल्या आंदोलना मधे तुळजापूर आागरतील एस टी कर्मचारी सहभागी आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळे यांनी भेट दिली. यावेळी आंदोलनकत्याशी सविस्तर चर्चा करुण भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष  चंद्रकांत पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यन्त आपल्या मागण्या पोहचविणार असल्याचे यावेळी अनिल काळे यांनी सांगितले .

तसेच गेल्या 60 ते 70 वर्षापासून लाल परी ही महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेची आर्थिक घड़ी बसवनरी वाहिका असून कर्मचारी नौकरी लागल्यापासून रिटायर होईपर्यंत तो कर्मचारी व् त्याचे कुटुंब आर्थिक विवंचनेत असतो ही खुप खेदाची बाब असून या आंदोलनाकडे सरकारने सकारात्मकदृष्ट्या नाही पाहिले तर आंदोलन अधिक तीव्र होईल याची जबाबदारी आघाडी शासनाची असेल तसेच आतापर्यंत जवळपास 38 ते 40 एसटी कर्मचारी यांनी आत्महत्या केलि याच पातक अघाड़ी शासनावर असून तुळजापूर आगारातील 18 कर्मचारी यांना निलंबित केले याचा त्यांनी निषेद करुण सर्व कर्मचारयाच्या पाठीशी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खंभीर पणे उभे आहोत हे आश्वासन अनिल काळे यांनी दिले.

या आंदोलनाला तालुक्याचे आ. राणा दादा यांनीही भेट देऊन मुंबई येथील आंदोलनाला भेट देऊन जाहिर पाठिंबा दिलेला आहे असे ही सांगितले यावेळी एसटीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

 
Top