उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

काँग्रेस पक्षात अनेकजण येतात व जातात पण काँग्रेसचा विचार कायम आहे. याच विचारावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रदेश अध्यक्ष पदाची निवडणुक आपण लढविणार आहोत त्यासाठीच युवा संवाद यात्रा सुरू केली आहे, अशी माहिती जि.प.सदस्य शरण बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

राहुल गांधी आणि देशात युवकांना सोबत घेऊन चळवळ उभा केली आहे. परंतू मोदी सरकार विविध निर्बंध घालून आवाज बंद करीत आहेत. देशातील अर्थ व्यवस्था पुर्णपणे ढासाळलेली आहे. कायदा व सुव्यवस्था संपुष्टात आली आहे. कांही राज्यात हिंसाचार घडत आहे. मात्र केंद्र सरकारचे यावर लक्ष नाही. महागाईवरील लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ड्रग्जच्या माध्यमातून लोकांना विचलीत केले जात आहे. परंतू राहुल गांधी मुख्य विषयांना वाचा फोडत आहेत.

मीच अध्यक्ष होणार

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रंेसचे सदस्य जो जास्त बनवेल तो अध्यक्ष होत असतो. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील १४ जण उभारलेले आहेत. परंतू मराठवाड्यातून मी एकटाच उभा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या विचारावर ठाम असलेले व्यक्ती मोठ्या प्रमाणात सभासद १२ नोँव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत नोंदणी करायचे आहेत. व निकाल १३ डिसेंबर रोजी लगेलच लागणार आहे.  त्यामुळे मीच अध्यक्ष होणार असा दावा ही शरण पाटील यांनी केला आहे. माझया सोबत अभिजीत बाबुराव चव्हाण यांचाही अर्ज तुळजाभवानीचे दर्शन घेऊन आम्ही दाखल केला आहे, अशी माहिती ही पाटील यांनी दिली. 

न.प.निवडणुकीत चांगले यश मिळवु

उस्मानाबाद न.प.मध्ये काँग्रेसचे केवळ दोन नगरसेवक आहेत. जिल्हयातील वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांना निवडणुकीत चांगल्या प्रकारे सहकार्य करीत नाहीत. त्यामुळेच दोनच नगरसेवक झाले आहेत, असाप्रश्न एका पत्रकाराने विचारला असता. यावर शरण पाटील यांनी आगामी न.प.निवडणुकीत जास्तीत-जास्त तरुणांना उमेदवारी देऊन आपण पुर्णपणे सहकार्य करणार आहोत व जास्तीत जास्त न.प.काँग्रेसच्या ताब्यात कसे येतील यावर भर असणार आहे. यावेळी जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने उपस्थित होते. 


 
Top