परंडा /प्रतिनिधी :-
येथील शिक्षण महर्षी गुरूवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील भौतिकशास्त्र व संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा डाॅ महेशकुमार माने यांचा जागतिक पातळीवर वैज्ञानिक जगतात ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’तर्फे जाहीर केलेल्या ‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२१’मध्ये समावेश झाला आहे. गुगल स्कॉलरवरील त्यांच्या संशोधनाचा गेल्या पाच वर्षांतील एच-इंडेक्स, आय-टेन इंडेक्स हे निर्देशांक तसेच सायटेशन स्कोअर (उद्धरणे) इत्यादी बाबींचे पृथक्करण केले आहे.
डाॅ महेशकुमार माने हे कळंब तालुक्यातील देवळाली गावतील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण मुरुड येथील जनता विद्यालयात झाले. पदवी रामकॄष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद व पदव्युत्तर शिक्षण गोल्ड मेडल सह डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून केले. पी एच .डी पदवी डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद विभागातील डाॅ के एम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केली. संशोधन करत असताना त्यांना युजीसी ची गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विज्ञानातील संशोधन फेलोशिप मिळाली होती. आजवर त्यांचे साठहुन अधिक शोध निबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या या यशामध्ये डाॅ सागर शिरसाठ व डाॅ राम कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
अगदी कमी वयात व ग्रामीण भागातील महाविद्यालयात अशी कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य संजयजी निंबाळकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ दिपा सावळे, महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे व महाविद्यालयात सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व मिञ परिवार यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने त्यांचा प्राचार्य डॉ दीपा सावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ अतुल हुंबे, डॉ सचिन चव्हाण, डॉ विशाल जाधव हे सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित होते.