तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर  नळदुर्ग रोड वर असलेल्या गजगा डान्सबारवर उस्मानाबाद पोलिस दलाच्या विशेष पथकाने  सोमवार दि २९ रोजी पहाटे  अचानक छापा मारून गजगा बार मधील पंचवीस महिला व  ६४ पुरुषांना  पोलिसांनी ताब्यात घेवुन  रोखरकमेसह सुमारे ६३ लाखाचा मुद्देमाल  जप्त केला. सदरील कारवाई सोमवार दि.२९रोजी पहाटे १.१५ वा.करण्यात आली. 

 या बाबतीत अधिक माहीती अशी की, तिर्थक्षेञ तुळजापूर शहरापासुन नळदुर्ग रोडवर असलेल्या हंगरगातुळ पाटी जवळ नुकताच गजगा  बार अँण्ड रेस्टाँरंट सुरु करण्यात आला होता. हा  नियमाप्रमाणे चालत नसल्याची माहीती मिळाल्याचा  पार्श्वभूमीवर कळंब विभागाचे उपविभागीय पोलिसअधिकारी  एस रमेश यांच्या नेतृत्वाखाली   पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई करत  २५ डान्सबारबाला व   ६४ पुरुषांना  ताब्यात घेतले येथे सर्वांचे नावे  मोबाईल नंबर घेवुन पंचनामा करण्यात आला.


 
Top