उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बजाज अलायन्झ पिक विमा कंपनीने उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पूर परिस्थिती मुळे पिकांचे नुकसान झाले असतानादेखील त्यांना नुकसान भरपाई देण्याचे टाळले आहे. त्यामुळे पीक विमा कंपनीने १०० टक्के नुकसान रक्कम द्यावी, या एकमेव मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात दि.३ नोव्हेंबर रोजी ३ तास ठिय्या आंदोलन केले. आंदोलना दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा करून लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, धनंजय पेंदे, नेताजी जमदाडे, दुर्वास भोजने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

 
Top