उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अखिल भारतीय नाट्य परिषद च्या  वतीने कायदेविषयक शिबीर   शनिवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी क्रांती चौक भीम नगर येथे संपन्न झाले. 

 यावेळी    दिवाणी न्यायाधीश मा.  वसंत यादव, उस्मानाबाद  बार असोसिएशनचे अध्यक्ष मा.नितीन  भोसले, माढेकर साहेब ,दिलीप पेठे,मा वडणे साहेब , अखिल भारतीय नाट्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विशाल शिंगाडे उपस्थित होते.   कायद्याची ओळख व अंमलबजावणी या विषयी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास  सुदेश माळाळे,सुनील बनसोडे,मिलिंद डावरे, मिलिंद बनसोडे प्रमोद नागटिळक राजेंद्र अत्रे ,सागर चौहान,सुगत सोनवणे , यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top