तेर / प्रतिनिधी 

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील रस्त्यालगत असलेली झाडे तोडू नयेत अशी मागणी निवेदनाद्वारे युवकांनी तेर ग्रामपंचायतीकडे केली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिर ते वस्तुसंग्रहालय  या मार्गावरील रस्त्यालगत असलेली जुनी झाडे रस्ता रुंदीकरणाच्या तसेच वाहतुकीस अडथळा यांच्या नावाखाली कंत्राटदार तोडणार आहेत ती झाडे पर्यावरण पूरक आहेत तसेच या झाडामुळे वाहतुकीस किंवा रस्ता रुंदीकरणाला  कोणताही अडथळा होत नाही.

सदर झाडे ग्रामसभा किंवा गावकरी यांचा ठराव घेतल्याशिवाय तोडण्यात येऊ नयेत तसेच विना मंजुरी किंवा गावातील नागरिकांना विश्वासात न घेता झाडे तोडल्यास आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस ग्रामपंचायत कार्यालय तेर तसेच संबंधित लोक जबाबदार राहतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर हनुमंत सोलंकर हरिदास इंगळे, ओंकार रोहिदास, रोहित थोडसरे, सोमनाथ आबदारे, पृथ्वीराज आंधळे, सचिन देवकते, करीम पठाण , रेवन पांचाळ, राम सोलंनकर, राजेश अंबाड व युवकांच्या सह्या आहेत.


 
Top