महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात नावलौकीक प्राप्त उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत दोन प्रमुख पॅनलमध्ये टक्कर होणार असल्याचे उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी स्पष्ट झाले आहे़. १४ जागेसाठी २९ उमेदवार रिंगणात उतरले असून सत्ताधारी नागदे-मोदाणी पॅनलविरूध्द भाजपचे सुधीर पाटील पॅनल आमने-सामने असणार आहेत. 
अखेरच्या दिवशी ७८ पैकी ४९ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले़.विद्यमान चेअरमन ब्रिजलाल मोदाणी यांची माघार घेतली तर त्यांचे चिरंजीव आशीष हे निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत.आजी -माजी चेअरमन नागदे -मोदाणी या यांची अखेरच्या दिवशी दिलजमाई झाली यासाठी जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी मध्यस्थीची भुमिका पार पार पाडली. उस्मानाबाद जनता बँक सहकार क्षेत्रातील एकमेव संस्था आर्थिक भक्कम स्थितीमध्ये आहे. बँकेची यशस्वी वाटचाल करण्यामध्ये नागदे-मोदाणी यांचाच प्रमुख वाटा आहे. असे असले तरी त्यांच्या विरोधात  सुधीर पाटील यांनी पॅनल उभा केला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात शाखा असलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची निवडणूक होत आहे़. संचालक मंडळाच्या १४ जागेसाठी होत असलेल्या या निवडणुकीत ७८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते़. ७८ पैकी मंगळवारी 9 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल ४९ जणांनी अर्ज मागे घेतले़ त्यामुळे १४ जागेसाठी आता २९ उमेदवार उरले आहेत़ २९ पैकी भाजप समर्थक पॅनलचे १४ तर सत्ताधारी गटाचे ब्रिजलाल मोदाणी व वसंतराव नागदे अर्थात आजी-माजी चेअरमन यांचे १४ अशा २८ उमेदवारात थेट लढत होणार आहे़ याशिवाय अन्य उमेदवारही नशिब अजमावत आहे़. विद्यमान चेअरमन श्री ब्रिजलाल मोदाणी व माजी चेअरमन श्री वसंत नागदे समर्थकांनी अपेक्षेप्रमाणे एकत्रित पॅनल निवडणूक रिंगणात उतरविला आहे़ यामध्ये माजी चेअरमन विश्वास शिंदे, स्वत: वसंतराव नागदे तसेच विद्यमान चेअरमन श्री़ ब्रिजलाल मोदाणी यांचे चिरंजीव आशिष मोदाणी यांच्यासह बहुतांश विद्यमान संचालक रिंगणात उतरले आहेत़ तर भाजप पुरस्कृत पॅनलकडून भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा पॅनलप्रमुख सुधीर पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काकडे यांच्या पत्नी, युवक नेते विनोद गपाट, भाजप ओबीसी आघाडीचे नेते पिराजी मंजुळे आदी भाजपची मंडळी निवडणुकीत उतरली आहे़ त्यामुळे उस्मानाबाद जनता बँक निवडणुकीत भाजप विरूध्द नागदे -मोदाणी पॅनल अशी थेट टक्कर होत आहे़.उस्मानाबाद जनता बँकेच्या महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटकात एकूण ३० शाखा असून ७० हजार सभासद आहेत़ महत्वाचे आर्थिक सत्ताकेंद्र असल्याने या निवडणुकीत आगामी काळात कोणकोणत्या घडामोडी घडतात ? याकडेच लक्ष वेधले आहे़. विद्यमान चेअरमन मोदाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचे सांगण्यात आले़ त्यांच्या ऐवजी आता त्यांचे चिरंजीव आशिष मोदाणी यांची उमेदवारी सत्ताधारी पॅनलमधून ठेवण्यात आली आहे़.


 
Top