उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यामध्ये जवळपास सर्वच तालुक्यात वारकऱ्यांना व लोककलावंतांना काही आर्थीक मूल्य आकारत आर्थिक संकटात टाकण्याचे काम काही वारकरी संघटना व व्यक्तीकडूनच केले जात आसल्याचे  दिसून आले आहे अशा संधीसाधू व्यक्ती व संघटनेच्या भूलथापांना बळी पडू नये असे उस्मानाबाद जिल्हा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या संघटनेच्या तालुकाध्यक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रसार माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्रक काढून करण्यात येत आहे .

वृद्ध कलावंत मानधन योजना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारीच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, वादक  आदी
56 हजार  वारकऱ्यांना 5000  रुपये देण्याच्या पॅकेजच्या घोषणेने काही वारकरी संघटना व व्यक्ती कडून अनेक गावांमध्ये या धर्तीवर काही फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू करुण कोरोणाच्या महामारीत आधीच संकटात सापडलेले वारकरी व लोककलावंत यांना पुन्हा आर्थिक संकटात टाकले जात आहे. हा फार्म भरून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये पन्नास रुपये ते दोनशे रुपये पर्यंत पैसे आकारले जात आहेत तर वृद्ध कलावंत मानधन या योजने संदर्भात मंजुरी पोटी मोठ्या प्रमाणात पैसे आकारणी केली जाते तसेच या फॉर्म भरते वेळी अपेक्षित छायाचित्रे काढणे, झेरॉक्स प्रती काढणे ,विविध संस्था मंडळाचे प्रमाणपत्रे संकलन करणे , वेळ व प्रवास खर्चाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा वारकरी व कलावंतांना नाहक होत आहे.

 तरी अशा गोष्टी वारकरी व इतर लोककलावंतांनी बळी न पडता शासनाच्या व्यवस्थेनुसार व त्यांच्या लेखी आदेशाने पाऊल उचलून कागदपत्र सादर करा परंतु आज पर्यंत शासकीय स्तरावरून कोणते ही परिपत्रक अथवा जीआर शासनाकडून निघालेला नाही तरी असे फार्म भरण्यासाठी वेळ व पैसा खर्च करू नये व अशी प्रक्रिया करणाऱ्या संघटना व व्यक्तींनी  दिशाभूल करत अशा प्रकारे दिशाभूल करत लाभार्थ्यांना संकटात टाकू नये 

असे अवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाच्या उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात येत आहे


 
Top