उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील खामसवाडी गावचे सुपुत्र वैभव बालाजी हिरे यांची सीमा सुरक्षा (बीएसएफ) दलामध्ये निवड झाली. आठ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून सुट्टीनिमित्त गावी आले असता त्याचा दहावी 2010 बॅच व राजमुद्रा प्रतिष्ठाणच्या वतीने जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, सचिन शेळके, पत्रकार हनुमंत पाटोळे, गोपाळ शेळके आणि राजमुद्रा प्रतिष्ठाण सदस्य हे उपस्थित होते.


 
Top