उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अतिवृष्टीने घरांचे आणि शेतीचे नुकसान झालेल्या तालुक्यातील इर्ला येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांचे हस्ते शनिवारी 2 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा हे वाटप करण्यात आले.

पुराच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत गढूळ झाले आहेत. हे पाणी पिऊन निसर्गाची अवकृपा वाट्याला आलेले लोक आजारी पडू नयेत. त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ नये, म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पिण्याच्या शुद्ध पाण्याचे शंभर जार, शुद्ध पाण्याच्या शंभर बाटल्या, लहान मुलांना बिस्कीट पुडे, टूथ ब्रश, पेस्ट, साबण, तांदूळ असे जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘एक हाथ मदतीचा’ या संकल्पनेतून हा कार्यक्रम करण्यात आल्याचे सांगितले आहे.


 
Top