उस्मानाबाद / प्रतिनिधी-
ईद-ए-मिलाद पैगंबर जयंती निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे उस्मानाबाद शहरात जुलूस कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक १८ ऑक्टोबर रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात फळ वाटप १९ ऑक्टोबर रोजी हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे दर्गाह येथे नमाज पठणानंतर लंगरचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी २ वाजता अरब मस्जिद पासून दर्गाह पर्यंत पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे रॅली नंतर लंगर आणि मोहम्मद पैगंबर यांच्या महत्त्वाच्या वस्तूचे प्रदर्शन ख्वाजा नगर येथील दारुल उलूम शम्शीया शाळेमध्ये भरवण्यात आले आहे
ताज चौक येथे सकाळी ९ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले आहे या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन जुलूस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे महंमद पैगंबर यांच्या जीवनावर १३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर पर्यंत शहरातील विविध मज्जीद मधून माहिती देणार असल्याचे जुलूस कमिटीचे अध्यक्ष हफिज अफजल निजामी यांनी दिली आहे हे सर्व कार्यक्रम कोविड नियम पाळून होणार असल्याने सर्वांनी नियमाचे पालन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.