उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या “यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी मुप्टा संघटनेचा जिल्हा मेळावा घेण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत आसताना मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतिश चव्हाण म्हणाले की,मुप्टा शिक्षक संघटनेने अनेक शिक्षकांचे संसार फुलवले,ख-या अर्थाने ही लढवय्या संघटना आहे .शिक्षण व्यवस्थेतजे काही प्रश्न निर्माण झालेत ते सोडवण्यासाठी व सरकारला जागे करण्यासाठी मुप्टा या शिक्षक संघटनेची स्थापना झाली  आहे .

पुढे बोलताना ते म्हणाले कीशिक्षकांच्या संघटना खूप आहेत पण मुप्टा ही संघटना आगळी वेगळी संघटना आहे .संस्थाचालक व अधिकारी यांना समजुन सांगण्याची हातोटी वाखण्ण्यासारखी आहे .

मा.गणपतराव मोरे [शिक्षण उपसंचालक,लातूर] यांनी बोलताना मुप्टा संघटना ही एका व्यक्तीचा प्रश्न घेऊन येत नाही याचा आम्हांला अभिमान वाटतो. नवीन येणारे बदल यावरही त्यांनी भाष्य केले

मुप्टा संघटनेचे संस्थापक सचिव प्रा.सुनिल मगरे यांनी या मेळ्यावाला उद्देशून बोलताना म्हणाले की”KG to PG शिक्षकांच्या न्याय हाक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून आपण शिक्षकांचा विश्वास संपादनकेला आहे .आनंदाने कोणी संघटनेकडे येत नाही कायम विनाआनुदानित शिक्षकांचा प्रश्न ,प्रचलित धोरणानुसा शिक्षकाला सेवासेर्थीचे नियम ,आनुदान मिळावे,उर्दू शिक्षकांच्या समस्या तर खूप आहेत  या सर्व सोडविण्यासाठी मुप्टा कटिबद्ध आहे, असे मत व्यक्त करुन उस्मानाबाद जिल्हा मेळाव्याला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहुन समाधानही व्यक्त केले 

यावेळी प्रा..हर्षवर्धन कोल्हापुरे,प्रा.प्रदीप रोडे,प्रा.डाॕ.संभाजी वाघमारे प्रा.डाॕ.समिउल्ला खान यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा आध्यक्षिय समारोप करताना प्रा.रवि सुरवसे यांनी उस्माबाद मुप्टा संघटना बांधणी करणे ,त्याचबरोबर मान्यवर यांनी ज्या भावना व्यक्त केल्या व आपेक्षा व्यक्त केल्या त्याबाबत आपले मत व्यक्त करुन नवीन मुप्टा संघटनेची कार्यकारणि जाहिर केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती पवार यांनी केले तर सूञसंचलन प्रा.अरविंद खांडके यांनी व आभार प्र.महेंद्र चंदनशिवे यांनी मानले या मेळाव्याला प्रचंड संख्येने शिक्षक उपस्थित होते. 


 
Top