उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे आयाजित करण्यात येणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी मंदिर प्रशासन आणि शासकीय विविध विभागातर्फे वेगाने सुरु आहे. अपती व्यवस्थानाच्या अनुषंगाने शासनाच्या विविध विभागांना त्यांच्या-त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित विभागांनी त्यांची कामे सुरु केली आहेत. त्या सर्व कामांनी तुळजापूरमध्ये वेग घेतला आहे. तथापि, संबंधित विभागांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी वेळेत पूर्ण करुन मंगळवारपर्यंत कार्यपूर्तीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिले.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पूर्व तयारी संबंधिची आढवा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली, तेव्हा ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अप्पर पोलिस अधीक्षक नवीन कॉवत अपर जिल्हाधिकारी रुपाली अवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, तहसीलदार तथा व्यवस्थापक  (प्र) योगिता कोल्हे, पोलिस निरिक्षक अजीनाथ काशीद, धार्मिक व्यवस्थापक इंतुले सिदेश्वर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एम.डी.बोडसे तुळजापूरच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंचल बोडखे आदीसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होत.

या बैठकीत पोलीस व गृहरक्षक दल, विद्युत व उर्जा विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय महामार्ग,आरोग्य विभाग,नगर विकास शाखा,तुळजापूर नगर पालिका,जिल्हा पुरवठा विभाग,प्रादेशिक परिवहन विभाग,महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ,अन्न व औषधी प्रशासन,मंदिरातील विद्युत विभाग आणि रोषणाई,तुळजाभवानी मंदिर आणि शहरातील पाणी पुरवठा  मंदिर प्रशासन,परराज्यातून येणाऱ्या त्या त्या राज्याच्या बसेस आदी विविध अनुषंगीक विषयांवर सविस्तर चर्चा होऊन त्याबाबत सूचना करण्यात आल्या.अधिकाऱ्यांनी 

मांडलेल्या सूचना आणि उपाययोजनांवर अंमलबजावणी करण्याची दिशाही यावेळी ठरविण्यात आली.

 कोरोना साथीच्या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 4 एप्रिल 2021 रोजी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.तथापि,24 सप्टेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार कंटेनमेंट झोन बाहेरची  मंदिरे, धार्मिक स्थळे,आणि प्रार्थना स्थळे 7 ऑक्टोंबर 2021 पासून उघडण्यास परवानगी दिली आहे.त्यानुसार जिल्हयातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान श्री.देवींजींच्या दर्शनासाठी भाविकाकरिाता 7 ऑक्टोंबर 2021 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपासून खुले करण्यात येणार आहे.तसेच श्री. तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सवही सर्व पारंपरिक विधीसह उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.या महोत्सव काळात दररोज  15 हजार भविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.तथापि,त्यांना अभिषेक पूजा आणि कोणतेही कुलाचार विधी करण्यास परवानगी असणार नाही,असेही यावेळी जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी स्पष्ट केले.

 या शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधासंबंधीच्या लसीचे दोन डोस घेतलेल्या भाविकांनाच श्री.देवीजींच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.त्याचबरोबर 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ,दुर्धर आजारग्रस्त,गरोदर स्त्रिंया आणि दहा वर्षाखालील बालकांना मंदिरात प्रवेश असणार नाही, असे सांगून जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी मंदिरात प्रवेश करते वेळी प्रत्येकांनी मास्क घालणे अनिवार्य आहे. मर्यादित स्वरुपात ऑनलाईन प्रवेश पासची सुविधा मंदिराच्या www, shreetuljabhavani. Org  या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी 6 ऑक्टोंबर 2021 पासून मंदिर प्रवेशासाठी नोंदणी करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 भाविकांच्या सुरक्षितेसाठी  शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत आयोजित 7 ते 21 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मंदिराच्या परिसरातील दोनशे मीटर परिसरात सोलेले नारळ आणि सुटे तेल विक्री करण्यास बंदी असेल. असे सांगून श्री. दिवेगाकर यांनी जिल्हा प्रशासनाने 28 सप्टेंबर 2021 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे 18 ते 20 ऑक्टोबर 2021 होणारी कोजागिरी पोर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यादिवशी  फक्त महंत, सेवेकरी .पुजारी अन्य मानकरी यांच्या उपस्थित श्री.तुळजाभवानी देविंजीच्या पुजा विधी करण्यात येणार आहेत. महंत, सेवेकरी, पुजारी, मानकरी आणि तुळजापूर शहरातील नागरिकांव्यतिरिक्त  इतरांना तुळजापूर शहरात 18 ते 20 ऑक्टोबर 2021 दरम्यान प्रवेश दिला जाणार नाही, असेही त्यांनी  यावेळी सांगितले.

 या महोत्सव काळात पुजारी बांधव आणि सेवेसाठी यांना दि.7 ऑक्टोंबर 2021 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपासून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.तसेच शारदीय नवरात्र महोत्सव 2019 मध्ये दिलेले ओळखपत्र सोबत ठेवाणे अनिवार्य असणार आहे.शिवाय त्यांना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.त्याचबरोबर पुजारी बांधबांनी मंदिरात प्रवेश करतेवेळी मंदिर प्रशासनाने ठरवून दिलेल्या ड्रेस कोडमध्ये असणे आवश्यक आहे.तथापि,मंदिर गाभारा आणि मंदिर परिसरात भविकांचे कोणतेही कुलाचार विधी करता येणार नाहीत,असेही मंदिर व्यवस्थापकांने स्पष्ट केले आहे.

 
Top