उस्मानाबाद / प्रतिनिधी-

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर लिहिलेल्या 2021 कवींच्या कवीता असलेल्या महाकाव्याचे संपादन शब्ददान प्रकाशन संस्था, नांदेडचे प्रा. अशोक कुमार दवने यांनी केले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातील निवडक कवींच्या कविता या महाकाव्य ग्रंथात समाविष्ट केलेले आहे. केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत कवितांताच यात समावेश आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात एकाच दिवशी प्रकाशित होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील कवितांचा एकमेव काव्यसंग्रह आहे. या महाकाव्याची नोंद गिनीजबुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डमध्ये निश्चितपणे होईल यात शंका नाही.

    या काव्यसंग्रहाचा सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, संशोधक यांना उपयोग होणार आहे. साहित्य विश्वात हा ग्रंथा माईलस्टोन ठरणार आहे. केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाच यामधील कवितांचा विषय आहे. असे असणारा का हा विश्वातील पहिलाच महाकाव्य ग्रंथ आहे. या महाकाव्य ग्रंथात तीन पिढयातील कवींच्या कवितांचा समावेश आहे. ई.सन 2021 मध्ये प्रकाशित होणारे 2021 कवींच्या कविता असणारा हा भारतातील एकमेव ग्रंथ आहे. निश्चितच भविष्य काळामध्ये या ग्रंथाचे अनेक भाषेमध्ये भाषांतरे होतील. साहित्य विश्वामध्ये या ग्रंथाची नोंद राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल. हा महाकाव्य ग्रंथ भदंत प्रा. सुमेधबोधी महास्थबीर, भदंत विनयबोधीप्रिय थेरो, भदंत ज्ञानरक्षित थेरो यांना व इतर मान्यवरांना अर्पण केला आहे.

    या ग्रंथात उस्मानाबाद येथील के.व्ही. सरवदे, विजय गायकवाड, राजेंद्र अत्रे, गणेश कुलकर्णी, संजय धोंगडे, डी.के. शेख, जयराज खुने, शहाजीराव कांबळे, रेखा ढगे, प्रमिला तुपेरे, जन्मेजय कांबळे, रमेश बोर्डेकर, शेखर गिरी, कविता पुदाले, संध्याराणी कोल्हे, सुमन पवार, विशाल वाघमारे, युवराज नळे, शामल ताकपिरे, रवी कदम, प्रा. राजा जगताप, वौष्णवी भगत, डॉ. वंदना जाधव, सुरेश कांबळे, माधव गरड, प्रमोद माने, देविदास सौदागर, गणेश मगर, पंडित कांबळे, तु.दा. गंगावणे, शब्दांकूर कांबळे इत्यादी कवींच्या कविता या महाकाव्य ग्रंथात आहेत. या महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन दि. 20 ऑक्टोंबर 2021 रोजी होणार आहे.

 
Top