उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील अन्नपूर्णा ग्रुप गेल्या सहा वर्षांपासून अन्नदानाचे काम करीत आहे, सार्वजनिक जीवनात काम करताना अन्नपूर्णा ग्रुपचे काम खूप प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार माजी राज्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी काढले.

बसवराज पाटील यांनी आज अन्नपूर्णा ग्रुपला सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासोबत जनता बँकेचे संचालक विश्वासआप्पा शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, प्रदेश सचिव दिलीप भालेराव, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, डॉ.स्मिता शहापुरकर, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, जावेद काझी, धनंजय राऊत, देवानंद येडके उपस्थित होते. अन्नपूर्णा ग्रुपने स्वर्गरथाची सेवाही उपलब्ध केलेली आहे. कोरोना काळात गरजूंना अन्नपूर्णाचा मोठा आधार मिळाला. अन्नपूर्णा ग्रुप सातत्यपूर्ण निस्वार्थ भावनेने करीत असलेल्या कार्याबद्दल प्रदेश काँग्रेसच्या वतीने बसवराज पाटील यांनी अभिनंदन केले.अन्नपूर्णा ग्रुपचे अतुल अजमेरा यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

यावेळी अन्नपूर्णा ग्रुपचे सदस्य पदम अजमेरा, अमर चांडक, अतुल अजमेरा, मुजाहिद सिद्दीकी, अमित अजमेरा, हरीश सारडा, आरतीताई अजमेरा, अभिजीत निंबाळकर उपस्थित होते.

 
Top