परंडा / प्रतिनिधी : - 

परंडा - भूम तालुक्यात दि.४ रोजी झालेल्या पाऊसाच्या अतिवृष्टीमुळे मौजे वाकडी तालुका परंडा येथील शेतकऱ्यांची पिके वाहून गेलेल्या पिकांची सोमवार दि.६ रोजी ११:३० वाजता माजी आमदार राहुल मोटे यानी पहाणी करून प्रशासनाला तत्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे  सूचना केल्या आहेत. 

 यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय हांडे, जवळा गटाचे संपर्कप्रमुख माजी सरपंच संजय पवार,ग्रामपंचायत सदस्य वाकडी जगताप सर, अनिल पाटील शिरसागर, उपसरपंच काशिनाथ वळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुका उपाध्यक्ष बंडू रगडे,ओबीसी तालुकाध्यक्ष दत्ता माळी, माजी उपसरपंच दत्तात्रय रगडे ,माजी सरपंच संघटना तालुका अध्यक्ष हनुमंत गायकवाड, अमर यादव, बाळू चोबे, भूम - परंडा तालुक्यातील  कार्यकर्ते, शेतकरी आदी उपस्थित होते.


 
Top