उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जि. प.उस्मानाबादच्या मा.उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी नितळी ( ता. उस्मानाबाद ) येथे बैठक घेवून विकास कामांचा आढावा घेतला.बैठकीत ग्रामस्थांनी प्रामुख्याने गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी स्रोत बदलून देण्याची मागणी केली. तसेच महावितरण बाबत शेतकऱ्यांनी तक्रारी मांडल्या. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून समस्या मार्गी लावण्याच्या सूचना अर्चनाताई पाटील यांनी दिल्या.

यावेळी श्री.बाळासाहेब खांडेकर, श्री.प्रभू माळी, श्री.दादा क्षीरसागर, श्री.सदाशिव साखरे, श्री.सतीश क्षीरसागर, श्री. बाबा कुलकर्णी, श्री. रंगनाथ शिंदे यांच्यासह महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top