उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मागील दोन वर्षापासून देशात सर्वत्र जागतीक कोव्हीड-19 सांसर्गीक महामारी सदृस्य परिस्थिती असतांना, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात अर्थिक अस्थिरता, औद्योगिक क्षेत्रात मंदीची लाट, गुंतवणुकीवरील व्याजदरामध्ये सातत्याने घट तसेच बँकेचे कार्यक्षेत्र असलेले महाराष्ट्र व कनार्टक राज्यात कृषी उत्पादनासाठी पाण्याची कमतरता / कोरडा दुष्काळ स्थिती असतांना देखील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक  मंडळाने आर्थिक प्रगतीमध्ये सातत्य ठेवून साल सन 2020-21 मध्ये (दिनांक 31 मार्च 2021 अखेर) रुपये 40 कोटी पेक्षा अधिक नफा मिळविलेला आहे. अशी माहिती, विद्यमान चेअरमन  ब्रिजलाल  मोदाणी यांनी वार्षींक सर्वसाधारण सभेत दिली. 


महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, सोलापूर व अहमदनगर जिल्हा आणि कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा कार्यक्षेत्र असलेली मराठवाड्यातील एकमेव बहुराज्यीय नागरी सहकारी बँक उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि., उस्मानाबाद या बँकेची 77 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सिध्दाई मंगल कार्यालय, औरंगाबाद-सोलापूर बायपास रोड, विद्यामाता हायस्कुलजवळ, नृसिह चौक, उस्मानाबाद येथे दिनांक 26.09.2021 रोजी दुपारी 1:00 वाजता बँकेचे अध्यक्ष श्री. ब्रिजलाल मोदाणी यांचे अध्यक्षतेखाली उत्साहपुर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

 बँकेच्या संचालक मंडळाने एक पथदर्शी घोरण व्हीजन समोर ठेवून वाटचाल केल्यामुळे बँकेसा व्यवसायात या दहा वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे आणि बँक एका महत्वपुर्ण टप्यावर पोहचली असल्याचे नमूद मोदाणी यांनी नमुद केले. मागील आर्थिक वर्षाचे तुलनेत चालू आर्थिक वर्षात बँकेने सर्वच क्षेत्रात सरासरी 10% पेक्षा अधिक साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या अर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्तम संचलित बकांसाठीचे रिझर्व्ह बँकांचे निकष पालन केले असल्याबाबत सांगण्यात आले.

बँकेने 31 मार्च 2021 अखेर रु.2800.00 कोटी व्यवसाय वाढीचा टप्पा पुर्ण केलेला आहे तसेच चालू अर्थिक वर्षात 3000.00 कोटीपेक्षा जास्त बँकींग व्यवसाय पुर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे.

मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षात भरघोस मोठ्या प्राणात बँकेस नफा झाल्याने संचालक मंडळ भारतीय रिझर्व्ह बँकेचे पुर्व-परवाणगीने लाभांश 8% देण्याबाबत बँकेचे अध्यक्ष बी.एस. मोदाणी यांनी जाहीर केले.

बँकेचे अध्यक्ष श्री.बी.एस. मोदाणी यांनी साल सन 2020-21 या आर्थिक वर्षात संचालक मंडळाने केलेल्या बँकेच्या आर्थिक प्रगतीच्या अहवालाचे वाचन करून बँकेचे हिशोबपत्रकांचे तपशिलवार वाचन करून स्पष्टीकरणासह माहिती सादर केली.

बँकेची दिनांक 31 मार्च 2021 अखेर अर्थिक स्थिती

सभासद संख्या 73456

भाग भांडवल रु.63.99 कोटी

निधी रु.310.95 कोटी

ठेवी        रु. 1754.08 कोटी 

कर्ज            रु.1079.22 कोटी

गुंतवणुक             रु.1005.92 कोटी

नफा             रु.40.18 कोटी

सध्यस्थितीत बँकेच्या महाराष्ट्रात 28 शाखा व कर्नाटकात दोन शस्खासह अशा एकूण 30 शाखा कार्यरत आहेत. उस्मानाबाद येथील शाखा व मुख्यालय, शिवाजी चौक लातूर, उदगीर, बीड, बार्शी, दत्त चौक सोलापूर, पंढरपूर, चाटी गल्ली सोलापूर, भूम, परंडा, उमरगा, नळदुर्ग, औराद (शा) अहमदपूर अशा एकूण 15 ठिकाणचे शाखा कार्यालये बँकेच्या स्वमालकीच्या इमारतीमध्ये सुरु आहेत.

बँकेने ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक सुविधा देण्यावर भर दिला असून C KYC, सेंट्रलाईजड क्लिअरिंग चेक्स, RTGS / NEFT, ई-मेल, एस. एम. एस. आधार लिंक गैस अनुदान इत्यादी ऑनलाईन सुविधा तसेच बँकेच्या सर्व सेव्हींग ठेव व चालू ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार ए.टी.एम./ डेबीट कार्ड देण्यात येत आहे. त्यामुळे व्यापारी व व्यवसायीक कर्जदार, ग्राहकांना पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी SWIPE मशीन POS चालू करण्यात आलेले आहे. त्यामुळे बँकचे एटीएम देशातअंतर्गत कोठेही वापरता येत आहे. त्यामुळे ग्राहकांना जलद सेवा मिळण्यास मदत होते आहे. बँकेने स्वतःच्या जागेत स्वतःचे डेटा सेंटर उस्मानाबाद येथे व डी.आर. साईट उदगीर येथे स्वतःच्या जागेत अद्यावत तंत्रज्ञानाने परिपुर्ण असे उभे केलेले आहे.

संचालक मंडळाने सामाजिक हिताच्या महत्वपुर्ण उपक्रमाना एक सामाजिक जबाबदारी म्हणून उदात्त हेतुने सध्या जगात देशात व राज्यात उदभवलेली कोरोना (COVID- 19) महामारी रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी बँकेच्या सर्व कर्मचारीवृंद कुंटुंबाच्या हितासाठी आरोग्य विमा प्रती व्यक्ती रु.4.00 लाख प्रमाणे बँक व्यवस्थापनाने घेतलेला असुन त्याचा आर्थिक लाभ सर्व कर्मचारीवृंद व त्यांच्या कुंटुबांना होत आहे.

थकीत कर्जदारांनी बँकेच्या वसुली कार्यवाहीचा कटु अनुभव टाळण्यासाठी वेळेत कर्ज परतफेड करावी व बँकेच्या प्रगतीत हातभार लावणेबाबत अध्यक्ष बी. एस. मोदाणी यांनी आवाहन केलेले आहे.

बँकेचे अधिकृत भाग भांडवलाची मर्यादा 100 कोटी झालेली आहे. त्यामुळे एका भागाची किंमत रुपये 100 वरुन रुपये 500/- करण्यात आलेली असून सर्व भागधारक सभासदांनी सदर बाबींची नोंद घेऊन अपुर्ण भागाची रक्कम त्वरीत आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन तात्काळ भरणा करावेत अशी विनंती करण्यात आली आहे. 

सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण समेत 31 मार्च 2021 चे नफा-तोटा पत्रक ताळेबंदपत्रक आणि अंदाजपत्रकपेिक्षा कमी/जादा झालेल्या खर्चास मान्यता, ऑडीट रिपोर्ट व प्रसिध्द केलेल्या अहवालास मान्यता दिली व चालू आर्थिक वर्ष 2021-22 करीता सुचविलेल्या अंदाजपत्रकास टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. तसेच मा. अध्यक्ष महोदयांच्या मान्यतेने ऐनवेळी उपस्थित आलेल्या विषयांवर चर्चा करण्यात येवून त्यासही समेत मान्यता देण्यात आली.

समेमध्ये बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक श्री. विश्वास शिंदे यांनी बँकेच्या प्रगतीबाबत व बँकेकडून देण्यात येणा-या ग्राहक सेवा सुविधा बाबत आपले प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले आणि अहवाल वर्षात बँकेचे सभासद, ग्राहक, हितचिंतक त्याचप्रमाणे राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय किर्तीच्या

थोर विभुती, कोल्हापूर, सांगली जिल्हयातील अतिवृष्टीमुळे पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेले जवान हे पंचतत्वात विलीन झाले त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. साल सन 2020-21 मध्ये बँकेस 40 कोटी 17 लाख नफा झाल्याबद्दल मा. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व मंडळ सदस्य तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. शोभा एम. वारद, सरव्यवस्थापक श्री. एम. बी. गायकवाड व सर्व कर्मचारी यांचे अभिनंदनाचा ठराव श्री. संजय दुधगांवकर यांनी मांडला व त्यास श्रीकिशन भन्साळी यांनी अनुमोदन दिले. त्यास वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सभासदांनी एकमताने मान्यता दिली.

बँकेचे उपाध्यक्ष आ. वैजिनाथ शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व सभा संपन्न झाल्याचे मोठ्या थाटात सांगण्यात आले.

उपस्थित मान्यवर सभासद बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वसंत नागदे, श्री. भागवतराव धस, संजय दुधगांवकर, बाळासाहेब शिंदे, संजय पाटील, श्रीकिशन भन्साळी, रवि ओझा, राजामाऊ जंत्रे, नानासाहेब निंबाळकर, उदयभानु हलवाई व व्यंकटेश माईंदे बिदर, आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शोमा म वारद, सरव्यवस्थापक एम. बी. गायकवाड व कर्मचारी उपस्थित होते. 

 
Top