तुळजापूर / प्रतिनिधी-

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड  अकाउंट ऑफ इंडिया जुलै २०२१ परीक्षेमध्ये तुळजापूर येथील कु. सृष्टी धनंजय पाटील हिने घवघवीत यश संपादन केले आहे. देशभरात बसलेल्या २० हजार  विद्यार्थ्यांपैकी केवळ २ हजार विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. 

कोरोना लॉकडाऊन परिस्थिती मध्ये गेल्या दोन वर्षापासून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करावा लागला.  या कठीण परिस्थितीत कुमारी सृष्टी पाटील हिने स्वतःच्या तयारीने परीक्षा देऊन हे कधीही यश संपादन केले आहे. या यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, संस्थेचे संस्थापक सचिव नरेंद्र बोरगावकर, संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर, उपाध्यक्ष संभाजीराव बाभळगावकर, संचालक बाबुराव चव्हाण, प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, प्राचार्य डॉ.अनिल शित्रे आदींनी कु. सृष्टी पाटील हिचे अभिनंदन केले आहे.

 
Top