तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत जळकोट (ता. तुळजापूर )  येथील कुलस्वामिनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना  400 टँब
चे वाटप करण्यात आले. कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाकडून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले आहे.त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, जळकोटचे सरपंच अशोक पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, माजी तालुकाध्यक्ष सिद्रामप्पा मुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप सोमवंशी, माजी नायब तहसीलदार माणिक चव्हाण,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख ‌कृष्णात मोरे,ग्रा.प.सदस्य गजेंद्र कदम, उपसरपंच पती बसवराज कवठे, बबन मोरे,पिन्टू चुंगे, महादेव सावंत, सरपंच ज्योतीका चव्हाण ग्रा.प.सदस्य विलास राठोड, रामचंद्र पवार, सिताराम राठोड, सुभाष नाईक, पांडुरंग चव्हाण, शंकर राठोड, विनायक चव्हाण, श्रीमंत राठोड, मुख्याध्यापक सुर्यकांत चव्हाण, विनायक राठोड उपस्थित होते. कार्यक्रमास प्राचार्य संतोष चव्हाण,शरद सुर्यवंशी, नागेंद्र गुरव, बाळासाहेब मुक्कम, आप्पासाहेब साबळे,किरण ढोले, देवानंद पांढरे,अमित खारे, चव्हाण,पाठक, पाटील,कार्लै, बालाजी राठोड, बंकट राठोड, कुचंगे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top