उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नगर परिषद उस्मानाबादची सर्वसाधारण सभा सोमवार दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत गुंठेवारी,प्लॉटची नाेंदणी, अनुकंपा तत्वावरील कर्मचारी कायम करणे ,न.प.च्या मालकीच्या गाळेधारकांची थकबाकी  वसूल करणे, शहराच्या स्वच्छतेची निवेदा काढणे आदी १३ विषयांवर सभागृहात वादळी चर्चा झाली.

यावेळी  मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे उपस्थित होते. केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियानातंर्गत असलेल्या २२.५ एलएलडी क्षमतेच्या जलशुध्दीकरण केंद्र चालविण्याकरिता मनुष्य बळ पुरवठा करणे, उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणारे, उजनी,खांडवी व हतलादेवी, पंपगृह येथील पंपींग मशनरी व सबस्टेशनची देखभाल दुरूस्ती करणे आदी संदर्भात निविदा काढण्याविषयी चर्चा करण्यात आली. उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणारे हतलादेवी पंपगृहजवळ सौर ऊर्जा प्रकल्पासाठी नगर रचनाकार यांच्याकडून दर निश्चित करून  जमिनी खरेदी करावा, असा मुद्दा नगरसेवक उदय निंबाळकर यांनी मांडला. 

कर्मचारी चकरा मारतात

नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी अनुकंपावरील कर्मचारी २००९चे पत्रक घेऊन आपल्याकडे चकरा मारतात.याबाबत सकारात्मक निर्णय सभागृहाने घ्यावा, असे सांगितले. यावर सिध्दार्थ बनसोडे, सिध्देश्वर कोळी, उदय निंबाळकर यांनी चर्चेत भाग घेऊन आपली मते मांडली. यावेळी मुख्याधिकारी येलगट्टे यांनी बिंदुनामावली तपासून लवकरच काम करण्यात येईल, असे सांगितले. 

गुंठेवारी नियमित करणे

मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यंानी नगर रचनाकार कार्यालय पुणे, यांच्याकडून आलेल्या पत्राचा हवाला देऊन आतायापुढे २००१ च्या कायद्याऐवजी २०२० चा कायदा असे म्हणावे लागेल. दर मात्र २००१ चेच राहणार असल्याचे सांगितले. यावर उदय निंबाळकर यांनी हे प्रसिध्दी पत्रक आहे कहा का ? जिआर  अथवा आध्यादेश आहे का ? असे विचारले असता मुख्याधिकाऱ्यांनी १२ मार्च २०२१ चा आध्यादेश आहे, असे सांगितले.  यावर उदय निंबाळकर, गणेश खोचरे, खलिफा कुरेशी, सूरज सांळुके आदींनी चर्चा करून नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी सक्षम प्राधिकरणाकडून यावर खुलासा मागवा, असे सांगितले. 

भाडे थकित दुकाने ताब्यात घेणार

न.प.मालकी असलेल्या कांही दुकानाचे भाडे गेल्या अनेक वर्षांपासून  थकीत आहेत. यावर नगरसेवक शिवाजी पंगूडवाले, सूरज साळुंके, उदय निंबाळकर, सिध्देश्वर कोळी, गणेश खाेचरे यांनी  आतापर्यंत एवढे भाडे कसे थकीत राहिले. याबाबत विविध प्रश्न विचारून एक वर्षांच्या पुढील थकीत दुकान भाडेकरूंवर कारवाई करण्याची मागणी केली. नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी कोवीड मुळे आपण एक वर्ष सवलत दिली होती.एक वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी थकीत असलेल्या दुकान भाडेकरूंना नोटीस देऊन गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे ठरले. यावेळी न.प.चा एक कर्मचारी वसूल झालेले पैसे घेऊन गायब झाला, याबद्दल काय ? कारवाई करण्यात आली याबाबत ही चर्चा करण्यात आली. 


 
Top