उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

भाटशिरपुरा ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशन अंतर्गत जलसंवर्धनाचे उत्कृष्ट काम केले असुन यासाठी घेतलेलया पुढाकाराचे व कष्टाचे कौतुक करत भाटशिरपुरा हे आदर्श गाव करण्यासाठी पुर्ण ताकतीने ग्रामस्थांसोबत आहे. उस्मानाबाद कळंब मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत नसलो तरी आपले ऋणानुबंध कायम आहेत अशा शब्दात जुन्या आठवणींना उजाळा देत लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेली खंबीर साथ आयुष्यभर स्मरणात राहील, असे प्रतिपादन आ.राणाजगजितसिंह पाटील  यांनी केले.

भाटशिरपुरा ता.कळंब येथे श्रीकृष्ण मंदीरासमोरील सभागृहाच्या भुमीपुजन प्रसंगी अामदार पाटील बोलत होते. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरात पैसे येणे आवश्यक असुन यासाठी देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी साहेबांनी ग्रामीण भागातील शेतकरी, मजुर, छोटे व्यवसायीक व कामगारांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. यामध्ये शेतकरी सन्मान योजनेचा आर्वजुन उल्लेख करत प्रधानमंत्री स्वनिधी योजना, इ-मुद्रा, किसान क्रेडीट कार्ड, आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत केंद्र शासनाकडुन देण्यात येत असलेल्या अर्थसहाय्य व सवलती चा उल्लुख केला. खरीप २०२० मधील पिकविम्या बाबत राज्य सरकार गंभीर नसुन शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवुन देण्यासाठी आपला न्यायालयीन लढा सुरु असुन यात नक्कीच यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

 उस्मानाबाद जिल्हयाची आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख पुसण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातुन जास्तीत जास्त निधी खेचून आण्ण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलुन दाखवीला. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रेल्वे जंक्शन करण्यासंदर्भात आपण प्रयत्न करत आहोत त्याच बरोबर कौडगाव एमआयडीसी मध्ये टेक्नीकल टेक्स्टाईल पार्क सुरु करणे बाबत आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगीतले. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड या सारख्या जिल्हयाच्या दृष्टीने महत्वपुर्ण असलेल्या प्रकल्पा बाबत राज्य सरकार अकार्यक्षम असले तरीदेखील त्याबाबतीत आपण पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत असुन हे प्रकल्प पुर्ण करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अस्मिताताई कांबळे,बाजार समिती सभापती रामहरी शिंदे, बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, संजय पाटील, पंडितराव टेकाळे, सुरेश कोरे, अनिल टेकाळे, उत्तम टेकाळे, दत्तात्रय साळुंके, भागचंद बागरेचा, अरुण चौधरी, बजरंग शिंदे, आर.के कोल्हे, प्रणव चव्हाण, नागनाथ घुले, शिवाजीराव गिड्डे , संजय अडसूळ, सरपंच सुनिता वाघमारे, उपसरपंच मेजर सूर्यकांत खापे, शिवराज गायकवाड, रामचंद्र खापे, उमेश रितपुरे, चेअरमन अंकुश गायकवाड, दिलीप वाघमारे, अशोक गायकवाड, रमेश रीतपूरे,जनक गायकवाड,विजय गायकवाड, श्रीहरी रितपुरे,अशोक खापे,रामराव पाटील, यांच्यासह ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top