तुळजापूर / प्रतिनिधी-

मराठवाडा जनविकास संघ, पिंपरी चिंचवड शहर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त  तुळजापूर (खुर्द) परिसरात आई तुळजाभवानीच्या विश्रांतीस्थळाचे बांधकाम आणि दीपमाळेचे संपूर्ण नूतनीकरण पूर्ण करण्यात आले. 

  तुळजाभवानी देवीच्या भक्तांच्या विश्रांतीस्थळाचा आणि दीपमाळेचा लोकार्पण सोहळा तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी  अरुण पवार यांच्या मातोश्री शकुंतला पवार, अरुण पवार, बालाजी पवार  पंडितराव जगदाळे, आबा कंदले, काळूबापू नन्नवरे, दत्तात्रय पवार, जयसिंग पाटील, सोमनाथ कोरे, रत्नाकर खांडेकर, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन रोचकरी यांनी अरुण पवार व बालाजी पवार यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. विश्रांतीस्थळ परिसरामध्ये मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांचे आभार रत्नाकर खांडेकर यांनी मानले.

 
Top