उमरगा  / प्रतिनिधी-

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी केले.

उमरगा पोलिस स्टेशनच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन बुधवारी दि.८ रोजी शहरातील चिंचोळे मंगल कार्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे या होत्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, प्रभारी तहसीलदार नंदकिशोर मल्लुरवार, पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव , नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. रौशन म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक नियमाचे पालन करुन, गर्दी न होवू देता साधेपणाने गणेशोत्सव साजरा करा. सार्वजनिक ठिकाणी चार फुटापेक्षा जास्त उंचीची व घरगुती दोन फुटापेक्षा जास्त उंचीची मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये. उमरगा तालुका हा शांतताप्रिय असून ही ओळख कायम ठेवावी. सार्वजनिक ठिकाणी मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे तसेच मोजक्या लोकांच्या मदतीने गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना श्री.रौशन यांनी दिल्या .

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, दिलीप भालेराव , कैलास शिंदे, अतिक मुन्शी, जगदीश सुरवसे, सुधाकर पाटिल, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे आदीनी मनोगत व्यक्त केले.यावेळी दिलीप भालेराव, माधव पवार, कैलास शिंदे, बाबूराव शहापुरे, रणधीर पवार, सिद्रामप्पा चिचोळे, नगरसेवक अतिक मुन्शी, बालाजी पाटील, बाबा औटी, आलीम विजापुरे, सुभाष सोनकांबळे, वंचितचे राम गायकवाड, चंद्रशेखर पवार, नितीन होळे, संदीप चौगुले उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस निरिक्षक मुकुंद अघाव तर सूत्रसंचालन प्रवीण स्वामी यांनी करून आभार मानले. कोरोनाच्या पुढच्या लाटेचीही चर्चा आहे. 

 
Top