उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ओला दुष्काळ जाहीर करावा, पूरग्रस्तांना तातडीने पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी या मागणीचे  निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना ३० सप्टेंबर रोजी   देण्यात आले. 

 जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अतिवृष्टी व गुलाब चक्रीवादळामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात२४ तासांमध्ये १८०मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे तेरणा नदीला पूर येऊन नदीच्या कडेला बसलेले गावे अक्षरशः पाण्यात आली होती त्यामुळे अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात सोयाबीन,उडीद मूग फळबागा यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पुराचा जबर फटका बसला असून त्यातून सावरण्यासाठी शेतकरी राजाला राज्य सरकारने दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून हेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत पंचनामे न करता तात्काळ देण्यात यावी तसेच कोरडवाहू पिकांना पंचवीस हजार रुपये मदत करण्यात यावी, अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांनी घेतलेल्या सर्व पिकांसाठी चे एक हेक्टर पर्यंत बँक कर्ज माफ करण्यात यावे,तसेच त्यांचे घर पाण्यात बुडले आहे वाहून गेले किंवा पूर्ण तहा नुकसान झाले आहे अशा व्यक्तिंना सानुग्रह अनुदान म्हणून पंचवीस हजार रुपये मदत द्यावी,दुकानदार, टपरीधारक, कारागीर, छोटे गॅरेज, व्यवसायिकांना नुकसानीपोटी सरसकट एक लाख रुपये मदत देण्यात यावी. जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झालेल्या दहा हजार रुपये मदत, दगावलेल्या मोठ्या पशुधनासाठी 50 हजार रुपये मदत, व छोट्या पशुधनासाठी पंधरा हजार रुपये मदत, पूरग्रस्त भागातील नागरिकांना तात्काळ शासनाच्या वतीने किराना गहू तांदूळ तेल व इतर अन्नधान्याचा पुरवठा मोफत करण्यात करण्याची मागणी केली आहे. 

 यावेळीशिक्षक सेना जिल्हाध्यक्ष, राहुल बचाटेसर,सलीम विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष, निलेश जाधव, उप तालुका अध्यक्ष,सलिमभाई औटी, उपजिल्हाध्यक्ष विद्यार्थी,सौरभ देशमुख, पृथ्वीराज शिंदे,ज्ञानेश्वर देशमुख आदी उपस्थित होते. 

 
Top