परंडा / प्रतिनिधी :-

राज्यातील ज्या नगर परिषदेच्या येत्या डिसेंबर २०२१ ला मुदत संपणार आहे त्या नगर परिषदेच्या निवडणूकीची तयारी शासन दरबारी तयारी सुरु करण्यात आली असून या निवडणूकी साठी मतदार यादी मध्ये बाहेर गावातील अनेक महिला व पुरुषांची मतदार यादीत बोगस नोंदणी झाली आहे. या साठी केंद्र स्तरिय अधिकारी (बी एल ओ) यांच्या मार्फत घर ते घर जाऊन अशा बोगस लावलेल्या मतदारांचा तपास करून त्यांचे  तात्काळ नावे वगळण्यात यावेत.अशी मागणी परंडा नगरपरिषद चे नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांनी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी व तहसीलदार परंडा यांना निवदनद्वारे केली आहे.

   परंडा नगर परिषदेची निवडणूक काही दिवसावर आली असून शासनाने २०११ च्या जनगणनेनुसार १८ हाजार ७५८ असणारी लोकसंख्या त्यात आसणारी लोकसंख्या व मतदारांची संख्या १५ हजार ४३०अशी संशयास्पद आढळत आहे. प्रभाग क्रमांक १ ते ८ च्या मतदार यादीत मुंबई, पुणे, इंदापूर, सोलापूर, बार्शी, करमाळा, लातूर, उस्मानाबाद, जामखेड, भांडगाव, चौसाळा, केज, कळंब, ढोकी आदी भागातील आनोळखी नागरिकांची बनावट कागद पत्रे तयार करून परंडा शहराच्या मतदार यादीत समावेश केल्या मुळे शहरातील मतदारांची संख्या वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काही लोकांनी मतदान यादीत बोगस नोंद करण्यासाठी वयाच्या पुराव्याच्या छायांकित प्रत मध्ये जन्म तारखेत बदल करून नोंदी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळेचा मुळ दाखला जन्म तारखेचा दाखला, आधार कार्ड तपासणी करून

या गंभीर बाबी चे सखोल चौकशी करून नोंद झालेल्या बोगस मतदार यादीतून नावे वगळण्यात यावे असे  निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना माहितीस्तव देण्यात आले आहे.

    दिलेल्या निवदेनावर नगराध्यक्ष जाकिर सौदागर, उपनराध्यक्षा मन्नाबी जिनेरी, राष्ट्रवादी काँग्रस चे गट नेते साबीर सौदागर, नगरसेविका खुर्शीदबी दखनी, रत्नमाला बनसोडे, संजना माने, नगरसेवक सर्फराज सौदागर, बच्चन गायकवाड, संजय घाडगे,  राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष वाजीद दरवनी, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष जावेद मुजावर , तन्वीर मुजावर , घनश्याम शिंदे, जयंत शिंदे, तय्यब शेख, जुबेर पठाण, अझहर शेख, जुबेर दखनी यांच्या सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top