![]() |
पारंपारिक वाद्याच्या दणदणाटात आणी मंगलमय वातावरणात गणरायाचे आज आगमन झाले. (छाया-मुकेश नायगांवकर उस्मानाबाद) |
उस्मानाबाद जिल्हयात सर्वत्र श्री गणेशाची साधेपणाने व पारंपारिक वाद्यांच्या गजारामध्ये साध्या पध्दतीने प्राणतिष्ठाना शुक्रवार दि.१० रोजी करण्यात आली. यावेळी श्रीगणेश भक्तांनी यंदा तरी कोरोनाचे विघ्ने दूर कर असे साकडे विघ्नहर्ता गणरायाला घातले. श्री गणेश चतुर्थीनिमित्त उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा, वाशी, कळंब, भूम, परंडा या तालुक्यासह शहरातील बाजारपेठेत लोकांनी प्रचंड गर्दी गेली होती. कोरोना वाढता धोका पाहून पोलिस विभागाच्या वतीने ध्वनी क्षेपणावरून गर्दी टाळ, मास्क वापरा आदी प्रकारच्या सूचना देत गस्त चालू असल्याची दिसून आले.
तुळजापूर शहरासह परिसरात विघ्नहर्ता गणरायाचे आगमन शुक्रवार दि.१० रोजी पारंपारिक पध्दतीने आगमन झाले. श्रीगणेश चतुर्थी पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदीरातच श्रीगणेश गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरातील श्रीमंत राजयोगी पावणारा गणपतीची पुण्य पावन ज्योत गुरुवार राञी शहरात काढण्यात येवुन नगर प्रदर्शने नंतर शुक्रवार आरंभ होताच ठिक 12:01 मिनटानी श्री गणपती बाप्पाची प्रती स्शापना किसान चौकी येथे नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी व त्यांच्या पत्नी यांच्या शुभहस्ते करण्यात आली .यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सज्जन सांळुके सह मंडळाचे पदाधिकारी कार्यकते उपस्थितीत होते.