तेर / प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील सिंचन विभागाचे विश्रामगृह दुरुस्त करून चालू करण्याची मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे उस्मानाबाद तालुका विद्यार्थी आघाडी प्रमुख रोहन कोळी यांनी पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे सिंचन विभागाचे दोन मजली विश्रामगृह असून पहिल्या मजल्यात एक हाॅल ,दोन सूट व भोजनालय आहे तर दुसऱ्या मजल्यावर एक हाॅल व एक सुट आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे विश्रामगृह बंद आहे. तेर येथे देश-परदेशातील अभ्यासक, पर्यटक व भक्तगण मोठ्या प्रमाणात येत असतात .त्यांना राहण्याची सोय व्हावी म्हणून सिंचन विभागाचे विश्रामगृह दुरुस्तीसाठी लागणारा निधी मंजूर करून सिंचन विभागाचे विश्रामगृह पूर्व चालू करण्याची मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे उस्मानाबाद तालुका विद्यार्थी आघाडी प्रमुख रोहन कोळी यांनी पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


 
Top