तेर / प्रतिनिधी-

 मानवी जीवनात सेवावृत्ती महत्त्वाची आहे असे प्रतिपादन गुंज सेवाभावी संस्थेचे मराठवाडा प्रमुख अजित कांकरिया यांनी केले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामसेवा संघाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित कांकरिया बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तगर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे होते.तर जागृती ग्रूपच्या  मनिषा वाघमारे,विश्वतेज प्रतिष्ठानचे झिया काझी,किरण पाटील( शिराढोण)अमर आडसूळ(ईटकूर) परमेश्वर गरड (खेड )फकिरा दलाचे प्रदेशाध्यक्ष सतिष कसबे,अॅड.गजानन चौगुले,तेर सोसायटी चे माजी चेअरमन व्यंकट माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी तगर अभ्यासक रेवणसिद्धप्पा लामतुरे म्हणाले की,तेर ग्राम सेवा संघाचे कार्य सर्वानी आदर्श घेण्यासारखे आहे असे प्रतिपादन केले.यावेळी तेर येथील महीला स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक नवनाथ पांचाळ यांनी केले तर आभार विलास टेळे यांनी मानले.यावेळी अॅड. बालाजी भक्ते, केशव सलगर, तानाजी पिंपळे,नरहरी बडवे, अॅड.अमोल रामदासी, रविंद्र शेळके, सिद्धार्थ कसबे, सारंग पिंपळे, गोपाळ थोडसरे, माधव मगर,समिर बनसोडे , संतोष लकापते, भगवंत सौदागर, सागर भक्ते, मेघराज भक्ते, सुधीर मोरे यानी परीश्रम घेतले.


 
Top