उस्मानाबाद / प्रतिनिधी-    

कळंब तालुक्यातील शिराढोण येथे बालाजी मंदिराच्या सभागृहासाठी औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या फंडातून पाच लाख रुपये देण्यात आले आहेत. या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.7) करण्यात आले.

याप्रसंगी शिराढोणचे सरपंच पद्माकर पाटील, प्रकाश मुंदडा, गणेश मुंदडा, सचिन मुंदडा, दयानंद मुंदडा, आलोकनाथ परदेशी, भाऊसाहेब पाटील, किरण पाटील, श्याम पाटील, वैभव यादव, राधिका पाटील, सुनील पाटील, परमेश्वर पाटील, विजय गायकवाड, संजय माळी आदींची उपस्थित होते.

 
Top