उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री, भारत सरकार अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे दि.25 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 ते 01.00 वाजता करण्यात आले आहे.

त्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदविण्याकरिता जिल्ह्यातील शेतकरी सहकारी संस्था, FPO यांना याबाबत परिणामकारक संवाद साधता यावा यासाठी जिल्ह्यात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म.उस्मानाबाद या बँकेच्या मुख्यालयातील सभागृह आणि उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि.उस्मानाबादच्या मुख्यालयातील सभागृह ही स्थळे निश्चित करण्यात आलेली आहेत.

जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था, FPO यांनी या कार्यक्रमास नमूद वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदवावा,असे आवाहन उस्मानाबाद येथील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.

 
Top