उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 उस्मानाबाद शहरातील रोडवरील अतिक्रमणे, मोकाट जणावरे- कुत्रे - डुकरे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी फोरम ऑफ उस्मानाबाद सिटिझन्स ( फूक ) च्या वतीने   मुख्याधिकारी, नगर परिषद, उस्मानाबाद यांच्याकडे निवेदनाद्वरे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,  साधारणता दोन वर्षांपूर्वी उस्मानाबाद न. प ने संपूर्ण शहरभर अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. शहरातील सर्व रस्त्यानी मोकळा श्वास घेतला होता. फूक संघटनेने त्यावेळी सर्व नप अधिकाऱ्यांचा व पदाधिकाऱ्यांचा सत्कारही केला होता. त्याचवेळी आम्ही अशी विनंतीही केली होती की, होणाऱ्या नवीन अतिक्रमनावर लक्ष ठेवण्यासाठी कायम स्वरूपी अतिक्रमण-विरोधी पाथकाची स्थापना करावी. परत तसे झाले नाही. आज परिणाम दिसत आहे. शहरातील सर्व रस्ते, चौक, बस स्थानक परिसर अतिक्रमणानी, फेरीवाल्यानी व टपरी वाल्याणी खचाखच भरला आहे. रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. हे लोक वाहन चालकाशी अरेरावी करतात. हुज्जत घालतात. नुकतीच ठाणे महानगरपालेकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची, एका फेरीवाल्याने हल्ला करून चक्क बोटेच तोडली. अशीच वेळ उस्मानाबाद फेरीवाल्याकडून शहरातील वाहन धरकावर भविष्यात ओढवः शकते.

 मोकाट जाणावरे पकडून कोंडवाड्यात घालणे आवश्यक आहे. प्रशासणाच्या व पशूवैद्यक खात्याच्या सहकार्याने, कुत्रे व डुकराची नसबंदी मोहीम राबाविणे आवश्यक आहे. शहरातील संपूर्ण अतिक्रमणे हटवून, दोन कर्मचाऱ्याच्या कायम स्वरूपी अतिक्रमण विरोधी पथकाची स्थापना करणे, व अतिक्रमण झाल्यास त्याच्यावर जबाबदारी टाकून, प्रसंगी त्यांच्यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे. सदर बाबत आपण लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.  

निवेदनावर एम.डी.देशमुख, मुकेश नायगावकर, गणेश वाघमारे, धर्मवीर कदम, र.वा. बाराते, एस.आर नागमोडे, डी.एम मेटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top