परंडा / प्रतिनिधी : -

 बाहेरगावाहून बैलाचे मटन आणून विक्री करत असल्याच्या रागातून शहरातील भर चौकात धारदार शस्त्राने भोसकून एकाचा खून केल्याप्रकरणी दोन आरोपींना भूम येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दि. ३१ ऑगस्ट रोजी सुनावली आहे. 

     सदरिल घटनेची अधिक माहिती अशी की दि.११ फेब्रुवारी २०१५ रोजी  दुपारी  साडेबारा वाजेच्या सुमारास परंडा शहरातील आझाद चौकाजवळ सद्दाम कूरेशी व सलमान उर्फ सलीम कुरेशी या दोघांनी  मयत हैदर अली शौकत अली शेख यास काठीने मारहाण केली व हैदर याच्या पोटात सलमान कुरेशी याने धारदार शस्त्राने भोसकून त्याचा निर्घृण खून केला होता. 

  शहरातीलआम्ही कसाब असताना बाहेरगावाहून बैलाचे मटन आणून विकतोस या रागातून सलमान कुरेशी व सददाम कुरेशी या दोन आरोपींनी सदरचा खून केला होता. उपचार सुरू असताना हैदर याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयत हैदर याचे वडीलांनी परंडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.भूम येथील अति सत्र न्यायालयात या खून प्रकरणी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते .

     या प्रकरणी सरकार पक्षाकडून १२ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा पुरावा तसेच परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सलमान उर्फ सलीम कुरेशी व  सददाम कुरेशी यांना जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

   या प्रकरणी सरकार पक्षातर्फे  अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. किरण कोळपे यांनी काम पाहिले. तर फिर्यादीतर्फे अॅड एच.एन.वाघमोडे यांनी सहकार्य केले.पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजीराव बळे यांनी काम पाहिले.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश सिरसाट यांनी केला होता.

 
Top