तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संत सावता माळी मंदिर ते निळा झेंडा चौकापर्यंत सिमेंट रस्ता दुरुस्त करण्याची मागणी तेर येथील सुनील गायकवाड यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत सावता माळी मंदिर ते निळा झेंडा चौकापर्यंत  सिमेंट रस्ता करण्यात आला होता. परंतु सध्या सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून सिमेंट रस्त्याचे लोखंडी गज अनेक ठिकाणी उघडे पडल्याने नागरिकांना व वाहनधारकांना जाण्या-येण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे. तरी विनंती की सिमेंट रस्ता दुरुस्त करण्याची मागणी तेर येथील सुनील गायकवाड यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 
Top