उमरगा / प्रतिनिधी-

 तालुक्यात अनेक गावातील जुने जंगल तोडून नविन लागवड सुरू असलेल्या बोगस कामांची योग्य चौकशी करून संबंधित दोषीवर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी वंचित बहुजन विकास आघाडी च्यावतीने मा जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देत करण्यात आली आहे.

तहसीलदार संजय पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, तालुक्यात जवळगाबेट, व्हंताळ, पेठसांगवी, समुद्राळ, सावळसुर, गुगळगाव यासह अन्य ठिकाणी आसलेले जुने जंगल वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या मार्फत जूनच्या महिन्यात पोकलेज, जेसीबी मशीन लावुन वृक्ष तोडण्यात आली आहे व लगेच त्याच मशीनद्वारे नविन झाडे लावण्यासाठी बोगस खड्डे खोदण्यात आली असुन सदरचे काम नियमबाह्य आहे, सदरील काम मार्च, एप्रील, मे महिन्यात करणे योग्य होते. मात्र पावसाळयातच जुने जंगल तोडणे, नविन लागवडीस खड्डे खोदणे व लागवड करण्याचे काम हे नियमाचे उलंघन होत असल्याचे दिसून येत आहे. खड्डे खोदण्यासाठी त्याच भागात मजुरामार्फत खड्डे खोदकाम केले तर मजुरांना काम मिळाले असते. मशीनद्वारे खड्डे काम सुरू असताना अनेक मजुर त्या ठिकाणी जावुन मशीन बंद करा मजुरावर काम झाले पाहीजे आम्हाला काम नाही म्हणून विनंती करण्यात आली असताना संबधीत अधिकाऱ्यांनी काम मजुरा मार्फत करायचे नाही,शासनाने आदेश दिले आहेत कि काम मशीन लावुन करायचे असल्याचे सांगितले. तसे आदेश असतील तर त्याचा पत्र देण्यात यावा. जुने असलेले झाडे जे.सी.बी, पोकलेन मशीनद्वारे तोडण्याची परवानगी घेतली आहे का ? सदरचे काम केलेल्या काळातील हजेरी पत्रक भरले आहे किंवा नाही भरल्यास त्याची माहिती, नविन झाडे लागवडी साठी खड़े नियमानुसार खोदलेले नाहीत, वरील गावाच्या शिवारातील मुळ किती हेक्टर जमीन आहे, नविन लागवड करण्यासाठी किती हेक्टर खोदकाम केले आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करुन त्यांचे जवळचे हितसंबंध असलेले मशीन लावुन काम बोगस करत गावची व शासनाच्या करोडो रुपये आलेला निधी हडप करण्याचा प्रयत्न दिसुन येत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करावी. अन्यथा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

निवेदनावर जिल्हा प्रवक्ता राम गायकवाड, तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार, महासचिव बाबूराव गायकवाड, उमाजी गायकवाड, बाबूभाई मुजावर, गौतम डिग्गीकर, नेताजी गायकवाड, संजय वाकडे, दिलीप सुरवसे, बाबासाहेब सोनकांबळे आदींच्या सह्या आहेत.


 
Top