तुळजापूर  / प्रतिनिधी-

तुळजापूरचे रहिवासी केशव रामचंद्र जोशी यांची नगररचनाकारपदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने जोशी यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. जोशी सध्या सोलापूर येथे सहाय्यक नगररचनाकार म्हणून कार्यरत आहेत. जोशी यांनी उस्मानाबाद, बीड, सोलापूरच्या नगररचना कार्यालयात सेवा बजावली आहे. केशव जोशी यांचे उच्च प्राथमिक पर्यंतचे शिक्षण शहरातील जिल्हा परिषद शाळेत झाले. नियुक्तीबद्दल केशव जोशी यांचे अभिनंदन होत आहे.


 
Top